बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री डी. सुधाकर यांचा सेक्स सीडीमधील महिलेशी संबंध असल्याच्या माध्यमांच्या वृत्तानंतर त्यांनी हे स्पष्ट केले की भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी यांच्या सीडी प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे म्हंटले आहे.
रविवारी हिरियूर शहरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सुधाकर यांनी, आपले नाव या प्रकरणात ओढले गेल्यामुळे आपल्याला धक्का बसला आहे आणि जर आपल्याला काही भीती वाटत असती तर त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला असता, असे म्हंटले आहे.
दरम्यान त्यांनी सीडीमधील महिलेला कधीही पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे आपण एसआयटी चौकशीला सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चांगले संबंध असल्याने केवळ त्यांना या प्रकरणात ओढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. बरेच लोक दररोज त्याला कॉल करतात आणि त्याला सर्व कॉल करणार्यांची माहिती नसते, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.