प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथील चौधरी वस्तीमध्ये बांधकाम सुरुअसलेल्या उघड्या घरातून टी व्ही, मोबाईल रोख रकमेसह ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना दिनांक १४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पुष्पा शिवाजी लोकरे ( रा. चौधरी वस्ती, कुर्डुवाडी) यांनी कुर्डुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचा मुलगा बालाजी सामानासह सदर ठिकाणी राहत आहेत. या घराचे बांधकाम सुरु असल्याने दरवाजे, खिडक्या अजून बसवलेल्या नाहीत. दोघेही रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घरात झोपले होते. सामान घरातच ठेवले होते. चोरट्यांनी रोख ९ हजार ५०० रुपये, १० हजार रुपये किमतीचा टीव्ही, ११ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.