म्हापसा प्रतिनिधी :
सोमवारी मध्यरात्री हडफडें मुख्य रस्त्यावर भरधाव कारगाडी रस्ता सोडून ओहोळात पडल्याने कारचालक आलियाना आबिकीवा (38 ) या किर्गीस्तानच्या महिलेचा गाडीतच गुदमरून बसल्याजागीच म्रुत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हणजुणचे पोलिस पथक उपनिरीक्षक कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, म्रुत आलियानाचा म्रुतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवुन देण्यात आला असून या अपघाताची माहिती किर्गीस्तानच्या दुतावासाला कळविण्यात आल्याचे उप-निरीक्षक कोरगावकर यांनी सांगितले. दरम्यान, आलियाना आबिकीवा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कारगाडीने कळंगुटहुन हणजुणच्या दिशेने भरधाव वेगाने येत असता हडफडें येथील सॉल्ट रेस्टॉरंट परिसरात पोहोचताच आलियानाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याशेजारच्या नारळाच्या झाडाला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली यावेळी धडक बसताच गाडी जवळच्या ओहोळात कोसळली, यावेळी स्टेरिंगवर असलेल्या आलियानाच्या नाका तोंडात ओहोळातील पाणी घुसल्याने गाडीतच गुदमरून त्यांचा म्रुत्यू झाला. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लागुं असतांनाही कळंगुट-बागा तसेच हणजुण वागातोरच्या किनारी भागात मोठय़ा प्रमाणात विदेशी लोकांची वर्दळ असते , रात्री अपरात्री बेफाम वाहने हाकणार्या अशा विदेशी लोकांपासून स्था?निकांच्या जीवीतास धोका असल्याने याभागात रात्रीची गस्त वाढविण्याची वारंवार मागणी स्था?निकाकडून करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी अशाच एका कार अपघातात गाडी चालकाचा ताबा सुटल्याने कारगाडी येथील ओहोळात कोसळली होती……