ऑनलाईन टीम / चंबा :
हिमाचल प्रदेशात कोरोनाच्या संसर्गाने जोर धरला असून मागील चोवीस तासात 4 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये चंबा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरग्राममधून आलेला केह बकान येथे राहणारा 23 वर्षीय एक युवक होम क्वारंटाइन होता. तो पॉझिटिव आढळला आहे. तर दिल्लीतून आलेला आणि लौटा सलूणी येथे राहणारा एका 23 वर्षीय युवकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अन्य दोघे जण बद्दी आणि नालगड भागातील आहेत. या दोघांचे नमुने रुग्णालयात घेतले गेले. हे दोघेही क्वारंटाइन नव्हते. यातील एक जण ट्रक चालक आहे तर दुसरा घरीच असतो. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण 15 ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.
दरम्यान, हिमाचल प्रदेशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 458 वर पोहोचली असून 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 200 पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.