नवी दिल्ली
दुचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी प्लेजर नुकतीच बाजारात दाखल केली आहे. 110 सीसी प्लेजर प्लस एक्सटेक ही स्कूटर कंपनीने आणली असून जिची किंमत 69 हजार 500 रुपये (एस शोरूम-दिल्ली) इतकी असणार आहे. कंपनीचे धोरण प्रमुख मॅलो ले मैसन यांनी या नव्या गाडीचे लाँचिंग केले. ही गाडी बीएस-सहा प्रणालीवरची असून याला प्रोजेक्टर एलइडी हेडलॅम्प आहे. याचा प्रकाश आधीच्या तुलनेतील दिव्यापेक्षा 25 जास्त जास्त असणार आहे.