प्रतिनिधी/ सातारा
ऐतिहासिक राजवाडय़ासमोरील चौपाटी ही तब्बल एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्या चौपाटीचे आळूच्या खडय़ातल्या मोकळय़ा जागेत हलवली आहे. परंतु तेथे खवय्ये जात नाहीत. आणि अनेक हॉकर्सचे गाडे अजूनही रिकामेच आहेत. त्यामुळे व्यवसाय बंद असल्याने व्यवसायिकांचे हाल सुरु आहेत. त्यातच बँका, पतसंस्थांच्या नोटीस आल्याने हॉकर्स हतबल झाले आहेत. त्यामुळेच आज सकाळी हॉकर्सची बैठक होवून त्या बैठकीत लढयाची दिशा ठरली असून सोमवारी मुख्याधिकाऱयांना घेराव घालण्याचे ठरले.
हॉकर्स धारकांच्या बैठकीला सागर भोगावकर, संजय पवार यांच्यासह हॉकर्स संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या बैठकीत हॉकर्स संघटनेकडे असलेल्या नोंदणीनुसार जे सभासद आहेत. त्या सभासदांवर अन्याय होता कामा नये याकरता हॉकर्सची जी नियमावली आहे. त्याच नियमावलीनुसार शहरातील हॉकर्स आपला व्यवसाय करतात. पालिकेला प्रशासनाला विरोध करायचा नाही. तर हॉकर्सधारकांना जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. त्या निर्णयानुसारच व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे अगोदर हॉकर्सधारकांचे प्रश्न समजून घ्यावेत. मगच पालिका प्रशासनाने कार्यवाही करावी, जेणेकरुन सातारा शहरात हॉकर्सधारकांचे व्यवसाय बंद असल्याने याचा जाब विचारण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना घेरोओ घालण्यात येणार असल्याचा निर्धार करण्यात आला.