वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस अंतराळात जाणार आहेत. बेजोस यांची ब्ल्यू ओरिजिन नावाची स्वतःची अंतराळ कंपनी आहे. 20 जुलै रोजी स्वतःच्या भावासोबत अंतराळासाठी रवाना होणार असल्याची घोषणा बेजोस यांनी केली आहे.
स्वतःच्या कंपनीकडून पाठविल्या जाणाऱया पहिल्या मानवरहित स्पेस फ्लाइटचा हिस्सा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमेझॉनचे सीईओ पद सोडल्याच्या 15 दिवसांनीच बेजोस अंतराळासाठी रवाना होणार आहेत.
वयाच्या 5 व्या वर्षांपासूनच अंतराळात प्रवासाचे स्वप्न पाहायचो. 20 जुलै रोजी स्वतःच्या भावासह एका नव्या ऍडव्हेंचरसाठी निघणार असल्याचे बेजोस यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. मे महिन्यात ब्ल्यू ओरिजिनने एक मोठी घोषणा केली होती. नवी फ्लाइट सादर करण्यात आली होती आणि यांतर्गत प्रत्येक फ्लाइटमध्ये 6 लोकांना अंतराळात नेता येणार आहे. अंतराळात जाणारे बेजोस हे पहिले अब्जाधीश ठरणार आहेत.
टेस्ला संस्थापक एलोन मस्क दरदिनी अंतराळ आणि मंगळावर जाणार असल्याचे सांगत असतात. पण अद्याप त्यांना यात यश आलेले नाही. पण आता बेजोस यांनी हा विक्रम आता स्वतःच्या नावावर करण्याचा निश्चय केला आहे.