क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
राष्ट्रीय सीनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱया दिवशी गोव्याचा फिडे मास्टर नितीश बेलुरकरने धक्कादायक विजयांची नोंद करताना दोन ग्रँडमास्टर्सना पराभूत केले. स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेल्या ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता (2612 एलो गुण) आणि पाचवे मानांकनप्राप्त ग्रँडमास्टर हर्षा भारतकोटी (2509 एलो गुण) यांना पराभूत केले.
सध्या नितीश बेलुरकरचे 5.5 गुण झाले असून तो तेराव्या स्थानावर आहे. गोव्याच्या अमेय अवदीचे 5 तर ऋत्विज परबचे 4.5 गुण झाले आहेत. ऋत्विज परबनेही आकर्षक विजयाची नोंद करताना ग्रँडमास्टर पी. इनियान (2506 एलो गुण) याचा पराभव केला. सदर राष्ट्रीय सीनियर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन टॉर्नेलो प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आली आहे.