दुर्लभ गॅस्ट्रोपॅरिसिस आजाराने पीडित 27 वर्षीय युवती, वजन केवळ 31 किलो, 10 वर्षांच्या मुलीइतके
ब्रिटनमधील 27 वर्षीय युवती गंभीर दुर्लभ आजाराचा सामना करत आहे. या आजारामुळे तिला दररोज 30 वेळा उलटी होत असते. एमिली वेबस्टर हे पोटाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असून त्याला गॅस्ट्रोपॅरिसिस म्हटले जाते. 2016 मध्ये एमिलीला सर्वप्रथम या आजाराबद्दल कळले हाते.
आता तिची प्रकृती अधिकच खराब झाली आहे. तिचे वजन कमी होत 31 किलो राहिले आहे. सर्वसाधारणपणे 10 वर्षीय मुलीइतके हे वजन आहे. एमिलीच्या स्थितीत पोटात आंशिक अर्धांगवायूसारखी स्थिती होते. या आजाराने ग्रस्त रुग्णाचे पोट सर्वसामान्य लोकांप्रमाणे रिकामे नसते. याचमुळे एमिलीला दिवसात 30 वेळा उलटी होत असते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एमिलीला प्रथम आयबीएस आजार झाल्याचे सांगण्यात आले होते. पण विविध चाचण्या करण्यात आल्यावर दुर्लभ आजाराबद्दल उमगले होते.
6 टक्के लोकांना आजार
एमिली ज्या दुर्लभ गॅस्ट्रोपॅरिसिस आजाराने पीडित आहे, तो आजार पूर्ण ब्रिटनमध्ये 6 टक्के लोकांना होत असतो. मागली 5 वर्षांमध्ये आपले पूर्ण जीवनच बदलले आहे. मी इतरांपासून एकाकी पडले आहे. कुठल्याही प्रकारे माझ्यावर शस्त्रक्रिया होऊन मी देखील सर्वसामान्य लोकांप्रमाणे स्वतःचे जीवन जगू शकेन याच आशेसह जगत असल्याचे एमिली सांगते.