लाखेंचे नुकसान : घरातील सर्व सामान बेचिराख
प्रतिनिधी /डिचोली
वरचावाडा साळ येथील शिवप्रसाद लक्ष्मण सावंत यांच्या राहत्या घराला आग लागून मोठय़ा प्रमाणात हानी झाली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काल बुधवार दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे सदर आग लागल्याची माहिती घरमालक शिवप्रसाद सावंत यांनी दिली.
या आगीत घराचे छप्पर जळून कोसळले तसेच घरतील वस्तू, कपडे, फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. भर दुपारी लागलेल्या आगीचा भडका उडाला व संपूर्ण घरचे आगीने वेढले. यामध्ये घर पूर्ण जळून सावंत कुटुंबाचा संसार उघडय़ावर पडला आहे. घराचा मुख्य भाग मातीचा, काही भाग चिरेबंदी आहे.
दरम्यान, अग्निशामक दलाने व पोलिसांनी घटनंचा पंचनामा करण्यात आला. सदर घरातील महिली पुष्पा सावंत ही एकटीच दुपारी घरात होती. मुलगा शिवप्रसाद व त्याची बायको दोडामार्ग येथे होती. त्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घडलेली घटना कळविण्यात आली तसेच शिवप्रसाद आल्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली. अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे अडीच तास प्रयत्नरत होते. अखेर पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्मयात आणली. तोपर्यंत घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत 4 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर दोन लाख रुपयांच्या वस्तू आगीपासून सुरक्षित वाचविल्या. यात अग्निशामक दलाचे उपअधिकारी मुकुंद गवंडी, ड्रायव्हर ऑपरेटर संदीप परब, फायर फायटर आदित्य गावस व विशांत वायंगणकर यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. तसेच पोलिस खात्याकडून रुपेश घुरे, हरी राऊत व होमगार्ड हरी गवस यांनीही आग विझविण्याच्या कामात मोलाचे सहकार्य केले. सदर कुटुबाची गरीब परिस्थिती असल्याने या कुटुंबाला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. समाजसेवी संस्थाकडून व गोवा सरकारकडून आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.