शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
दसऱयाच्या मिरवणुकीत मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनीत गोळीबार झाला होता. या गोळीबाराचे फोटो युवतीने आपल्या मोबाईलमध्ये काढले आणि अमीर मुजावर याला पाठविले. ही बाब गोळीबार करणाऱया टोळीतील युवकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला धमकावले. त्यानंतर तिच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तिच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दसऱया मिरवणुकीत ढोणे कॉलनीत युवकांच्या दोन गटात गाडी पायावून गेल्याने बाचाबाची झाली. यावरून एकाने पिस्तुल काढून गोळीबार केला. या संपूर्ण प्रकाराचे फोटो याच कॉलनीतील अपुर्वा कदमने काढले होते. हे फोटो तिने अमीर मुजावर याला पाठविले. याची माहिती पराग निवळे (रा. मनामती चौक, सातारा) याला कळली. त्याने शुक्रवारी प्रसन्न दिक्षीत, खरात, व इतर सहा जणांना घेऊन रामाचा गोट येथील अपुर्वाच्या अपार्टमेंटमध्ये गेला. यावेळी भांडणाचे फोटो अमीर मुजावर याला का पाठविले अशी विचारणा करत तिच्या डोक्याला पिस्तुल लावली. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे अपुर्वा व कुटुंबातील सदस्य घाबरले हेते. त्यानी पराग, प्रसन्न व खरात सह इतर सहाजणाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होताच पराग, प्रसन्न व खरात या तिघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला करत आहेत.