सॅमसंग नोव्हेंबर तर ऍपल डिसेंबरमध्ये अपडेट करणार 5-जी सेवा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी देशात 5 जी सेवा सुरू केली. त्यानंतर एअरटेल 8 शहरांमध्ये आणि रिलायन्स जिओने 4 शहरांमध्ये ही सेवा सुरु केली आहे. मात्र, अनेक कंपन्यांचे हँडसेट 5 जी नेटवर्कला सपोर्ट करत नाहीत. या तक्रारीनंतर दूरसंचार सचिव के राजारामन यांनी दूरसंचार ऑपरेटर आणि 30 मोबाइल हँडसेट उत्पादकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती.
यामध्ये दूरसंचार विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱयांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना तीन महिन्यात 5जी स्मार्टफोन 5 जी सेवांशी सुसंगत व सक्षम बनवण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तासाभराहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत टेलिकॉम ऑपरेटर्स आणि स्मार्टफोन कंपन्यांनी विलंबासाठी एकमेकांवर आरोप केले. बैठकीत, स्मार्टफोन कंपन्यांनी मान्य केले की ते 5जी सेवा प्रदान करणाऱया कंपन्यांसह हँडसेटची चाचणी सुरू करतील. हळूहळू अधिक महागडय़ा 3जी-4जी फोनचे उत्पादन बंद होणार असून 5जी मोबाइल फोनचे उत्पादन वाढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्या शहरांमध्ये 5जी सेवा सुरू झालेली नाही, तेथे 5जी फोन असलेले बरेच लोक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. वास्तविक, अशा फोनमध्ये सॉफ्टवेअर लॉक असते. दूरसंचार उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5जी सपोर्टसह फ्रिक्वेन्सी बँड उपलब्ध नसल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. हँडसेट उत्पादक अपडेट जारी करतील. काही फोन सेटिंग्जदेखील बदलणे आवश्यक आहे.
5जी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. मग का?
दूरसंचार विभागासोबत कंपन्या आणि ऑपरेटर यांच्यात झालेल्या बैठकीत, टेलिकॉम ऑपरेटर्सने सॉफ्टवेअर अपडेट्स आणि पॅच रोल आउट करण्यात विलंब झाल्याबद्दल हँडसेट कंपन्यांना जबाबदार धरले. फ्रिक्वेन्सी, स्पेक्ट्रम लिलाव आणि वाटपाची अंतिम मुदत फोन कंपन्यांना माहीत होती असा युक्तिवाद केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्याचवेळी, हँडसेट उत्पादकांनी स्पष्ट केले आहे की 5जी नेटवर्क अद्याप मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध नाहीत.
हँडसेट 5 जी सक्षम आहे, का नाही याची माहिती घेणे आवश्यक?
भारतात विविध कंपन्यांकडून 5जी ला सपोर्ट करणारी 128 मॉडेल्स उपलब्ध आहेत. एअरटेलने अशा 116 हँडसेटची यादी जारी केली आहे. यामध्ये रियलमी, शाओमी, ओप्पो, विवो, वनप्लस इत्यादी कंपन्यांचे हँडसेट समाविष्ट आहेत.
पण व्यावसायिक क्षेत्रात प्रवेशाची शक्यता कमी
अदानी ग्रुपची कंपनी अदानी डेटा नेटवर्क लि. ज्याला दूरसंचार सेवांसाठी परवाना मिळाला आहे. स्पेक्ट्रम घेतल्यानंतर परवाना घेणे आवश्यक होते. आता कंपनी देशातील सर्व दूरसंचार सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे.