बेळगाव : नवनवीन वस्तूंचे स्टॉल्सचे आयोजन करून, संपूर्ण राज्यात प्रसिद्ध पावलेल्या ’गृहशोभा’ या बेंगळूरस्थित आयोजकांतर्फे बेळगावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खानापूर रोडवरील मंगल मेटल शेजारच्या खुल्या जागेत 12 दिवस प्रदर्शनाचे आयोजन केले असून, आता केवळ शेवटचे 4 दिवस राहणार आहे.
या प्रदर्शनात 70 हून अधिक वेगवेगळय़ा प्रकारच्या मोठय़ा स्टॉल्सनी भाग घेतला असून, नागरिक खरेदीचा आनंद लुटत आहेत. गृहशोभा म्हणजे घराची सजावट. त्या सजावटीसाठी लागणारे फर्निचर, सोफा सेट्स, चेअर्स, पडदे, 3 डी फोटो, ज्वेलरी, गॅस स्टोव्ह, राजस्थानी चुरण, लोणची, लेडीज डेस मटेरियल, कुर्ते पायजमा, लहान मुलांचे कपडे, खेळणी, स्वेटर्स, बॅग्स इलेक्ट्रिकल स्कूटर्स, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, केरळ आयुर्वेदिक तेल, म्हैसूर नमकीन, कॉस्मेटिक्स, फुटवेअर, जयपूर पापड, खादी शर्ट, क्रोकरी आयटम्स, ड्रायफुटस, आयुर्वेदिक औषधे, राजस्थानी जूते, किचन वेअर्स, जी. आर. बी. ची उत्पादने, डॉ. चप्पल, रिरायटेबल पुस्तके, मयोरा बिस्कीट, महालक्ष्मी गिरणी, गॅस सेव्हर, पंजाब कुर्ती, केपीएल खोबरेल तेल, स्टार ब्युटी कलेक्शन, मेटल फ्लॉवरपॉट, लेडीज गाऊन, मोबाईल कव्हर, विंडो डोअर कर्टन्स, टी शर्ट, जॅकेट अशा नानाविध साहित्याने नटलेले हे प्रदर्शन बेळगावकरांना निश्चित आवडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.