A cow died in the cowshed at Malewad
मळेवाड धनगरवाडी येथील धाकू रामा शेळके यांच्या दोन गायींच्या गव्या रेड्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मळेवाड येथील धाकू रामा शेळके यांची जनावरे माळरानावर चरण्यासाठी गेली होती या जनावरातील एका गाईवर ६ ते ७ गवा रेड्याच्या कळपाने हल्ला केला.
यावेळी त्या गाईने त्याच्यांशी झुंज दिली यावेळी आपल्या कळपातील गाईवर हल्ला केल्याने दुसऱ्या गाईने गवा रेड्याना हुसकावण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गवा रेड्याच्या कळपासमोर त्या दोन्ही गाईची झुंज अपयशी ठरल्याने अखेर त्या दोन्ही गाईचा मृत्यू झाला. यातील एक गाय गाभण होती गाईचा मृत्यू झाल्याने मालक धाकू रामा शेळके व त्यांचे कुटुंबीय हवादिल झाले. या घटनेची कल्पना शेळके यांनी उपसरपंच हेमंत मराठे यांना दिली नंतर मराठे यांनी वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. यानंतर शवविच्छेदन व पंचनामा करण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव व वनरक्षक आबासाहेब राठोड व वनपाल खोराटे घटनास्थळी दाखल झाले. गवा रेड्याच्या वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी वनविभागाकडे केली आहे.
न्हावेली / वार्ताहर