म्हापसा/प्रतिनिधी
कळंगुट भागात बेकायदा कार्यरत असलेल्या डान्सबारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा ऐतिहासिक ठराव रविवारी झालेल्या कळंगुट पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्था?च्या जोरदार पाठींब्यात मंजूर करण्यात आला. या ठरावाची लवकरात लवकर अंबलबजावणी करण्यात येणार असल्याचे सरपंच जोझेफ सिक्वेरा यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कळंगुट गांवच्या गांवपणाला लांन्छन आणणार्या अवैद्य व्यवसायायाविरोधांत पंचायत मंडळ एकवटाने उभे राहाणार असून यापुढेही अशा प्रकारच्या व्यवसायांना कुठल्याही परिस्थितीत पंचायत कडून परवाने दिले जाणार नाहीत याची ग्वाही सरपंच सिक्वेरा यांनी यावेळी दिली. दरम्यान, बहुतेक वेळा स्वता गांवचे लोकच बार- रेस्टॉरंटृस चालवण्यासाठी पंचायत कडे अर्ज दाखल करतात व राजकीय लोकांचे वजन वापऊन परवाने मिळवतात परंतु कालांतराने हेच लोक बार-रेस्टॉरंटच्या नावाने परप्रांतीय व्यवसायिकांना अवैद्य धंदे सुऊ करण्यासाठी प्रोत्साहन देतात त्यामुळे गांवचे गांवपण राखुन ठेवण्यासाठी ग्रामस्था?चीही मदत आवश्यक असल्याचे पंचायत मंडळाकडून सभेला सांगण्यात आले, तसे आवाहन पंचायत पंचायत मंडळाकडून उपस्थित ग्रामस्था?ना करण्यात आले. याशिवाय, दुकानदार तसेच छोटे-मैठे हॉटेल व्यवसायिक तसेच कर्नाटकी शहाळी विव्रेते यांच्याकडून कळंगुट ते सिकेरीपर्यतच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीबरोबरच पादचार्यांच्या पायवाटेत अडथळा निर्माण केलेल्याने जागोजागी होणारे रस्ते अपघात , सेंट एन्था?नी कपेल परिसरात होणारी वाहनांची कोंडी याबाबतीत स्थानिक आगुस्तीन डिकॉस्ता यांनी ग्रामसभेला निवेदनाद्वारे सुचित केले व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, रस्त्याच्या कडेला रेडीमेड कपड्यांची दुकाने थाटून बसलेल्या लमाणी व्यावसायिकांकडून त्यांच्या दुकानासमोर पर्यटकांनी दुचाक्मया उभ्या केल्यास पर्यटकांना मारहाण करण्यात येत असल्याचेही ग्रामस्था?नी ग्रामसभेला सुचित केले व अशा व्रुत्या?मुळे गांवचे नांव विनाकारण बदनाम होत असल्याचे सांगितले. दरम्यान, किनारी भागात जमा होणारा कचरा , रस्त्यात भटकणारी भटकी कुत्रे, जनावरे त्यामुळे होणारे अपघात , वाहनचालकांत होणारी भांडणे आदी प्रŽ कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर यांनी उपस्थित केले यांवर सरपंच जोझेफ सिक्वेरा व इतरांनी त्यांना यासंबंधात कारवाई करण्याचे त्यांना आश्वासन दिले. यावेळी, समाजसेविका माहि सिमेपुऊषकर यांनी ग्रामसभेत अनेक प्रŽ उपस्थित केले.