रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडसीकरला अनुमती : परवानगी देण्याचे अधिकार पंचायत, पालिकांना
प्रतिनिधी /पणजी
पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने रात्री 10 ते 12 या वेळेत ध्वनीक्षेपक तसेच सार्वजनिक कार्यक्रमात मर्यादित आवाजासाठी अनुमती दिली असून ती काही ठराविक दिवसांसाठी सण-उत्सव काळात लागू करण्यात आली आहे. वरील वेळेत अनुमतीसाठी अर्ज आल्यानंतर संबंधित पंचायती, पालिकांनी त्या अर्जाची पडताळणी कऊन आवाज प्रदूषण नियमानुसार मान्यता देण्याची सूचना करण्यात आली आहे. वरील वेळेतील कार्यक्रम किंवा ध्वनीक्षेपकासाठी अनुमती दिल्यानंतर आवाजाच्या पातळीची नोंद करण्यात यावी आणि मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे खात्याने बजावले आहे.
गोव्यात अनेक कार्यक्रम, सण-उत्सव रात्री उशिरा होतात म्हणून रात्री 12 पर्यंत तरी आवाजाचे नियम शिथिल कऊन अनुमती देण्याची मागणी होत होती. रात्री 10 नंतर आवाज प्रदूषण होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाने मर्यादित पातळीपेक्षा जास्त आवाजावर बंदी घातली होती आणि कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना, प्रदूषण मंडळाला दिले होते. त्यावर अनेकांनी आपापली मते मांडली होती. घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठी रात्री 10 नंतर 12 वाजेपर्यंत तरी मुभा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जनमानसातून पुढे येत होती. त्याची दखल घेऊन दोन तासांसाठी आवाजाकरीता शिथिलता देण्यात आली आहे. पंचायती, पालिकांनी मात्र त्याकडे लक्ष ठेवावे, असे खात्यातर्फे बजावण्यात आले आहे.
लेखी अनुमती घेणे बंधनकारक
कार्निव्हल, शिमगोत्सव ईस्टर, गणेशचतुर्थी, नवरात्री, दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष या व इतर प्रमुख उत्सवाच्या दिनी रात्री 10 ते 12 पर्यंत मर्यादित आवाजात कार्यक्रम करण्यास ध्वनीक्षेपकसाठी अनुमती देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधितांकडून अर्ज येणे आवश्यक असून त्यावर अनुमती लेखी स्वऊपात मिळाली पाहिजे, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. चालू वर्ष 2023 साठी ही शिथिलता देण्यात आली असून लोकांना घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रम संबंधित दिवशी 12 पर्यंत मर्यादित आवाजात करता येणार आहेत.