एका नायजेरियन संशयिताला अटक
प्रतिनिधी/ पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) आसगाव येथे केलेल्या कारवाईत 2 लाख 80 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव जॉफरी सॅम्युएल (42) असे आहे. संशयित मूळ नायजेरियन असून गेल्या काही महिन्यापासून तो आसगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.
ड्रग्जची विक्री करण्यासाठी संशयित सिली सॉल रेस्टॉरंट जवळ असलेल्या पार्किंग जागेत येणार असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयिताला शिताफीने अटक करण्यात आली. संशयितांकडून 20 ग्रॅम कोकीन व 8 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आला आहे. संशयित ड्रग्ज प्रकरणातील सराईत गुन्हेगार असून त्याला या अगोदर हणजूण पोलिसांनी तसेच एएनसी पोलिसांनी अटक केली होती. प्रत्येकवेळी त्याची जामिनावर सुटका होते नंतर तो काही दिवस गप्प राहतो आणि पुन्हा काही दिवसांनी तो बेकायदा व्यवसायाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.