ऑनलाईन टीम / रोम :
इटलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप कोरोनाबळींच्या कुटुंबियांनी केला होता. त्यावरून पंतप्रधान ज्यूसेप कोंटे यांच्यासह गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची सरकारी वकिलांनी चौकशी केली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांनी सरकारविरूद्ध कोरोना महामारीवर दुर्लक्ष केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हॉटस्पॉट भाग सील करण्यात आले नसल्याचाही आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.
पंतप्रधान ज्यूसेप कोंटे यांच्यासह गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत लॉकडाऊनची धोरणे, कोरोनाचा प्रभाव वाढत असताना केलेल्या उपाययोजना याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले. कोंटे यांच्यावर जे आरोप करण्यात आले, ते सर्व त्यांनी फेटाळून लावले आहेत. ज्या भागात आरोप करण्यात आले आहेत, तिथे विरोधी पक्षाचे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.