मागील महिन्यात 59 चिनी ऍप्सना दिला होता दणका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाखवरून निर्माण झालेला तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नसतानाच भारताने चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱयांदा मोठी कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात 59 ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता चिनी बनावटीच्या आणखी 47 ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
नव्याने बंदी घालण्यात आलेल्या ऍप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अ?ॅपचा समावेश आहे. केंद्र सरकारने शुक्रवारीच यासंबंधीचा निर्णय जारी केला असला तरी अद्याप ऍप्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. नव्याने बंदी घातलेल्या अ?Ÿप्सची यादी लवकरच जारी केली जाणार आहे. तरीही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यामध्ये पब्जी, लुडो यासारख्या स्मार्टफोनधारकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ऍप्सचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आणखी ऍप्सही रडारवर
नव्याने बंदी घातलेल्या अ?Ÿप्सच्या यादीत यावेळेस काही आघाडीच्या गेमिंग अ?Ÿप्सचा समावेश असण्याची दाट शक्मयता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय युजर्सची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे केंद्र सरकारने अजून 250 अ?Ÿप्सची यादीही बनवल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी 29 जून रोजी टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा 59 लोकप्रिय चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती.