संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पाऊस
प्रतिनिधी/रत्नागिरी
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून तेथे 142 .30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, 24 तासात सरासरी 92.71 मिमी तर एकूण 834.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून काजळी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
गेल्या 24 तासातील पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
मंडणगड 102.30 मिमी, दापोली 70.80, खेड 98.60 मिमी, गुहागर 110.60, चिपळूण 83.60 मिमी, संगमेश्वर 142.30 मिमी, रत्नागिरी 33.30 मिमी, राजापूर 60.30 मिमी, लांजा 65.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.