सरपंच चर्चेत होणार सहभागी
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिह्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार ग्रामीण भागामध्ये ग्रामस्तरीय कृती समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीच्या अध्यक्षांच्या ऑनलाईन व्हीसी दि.19 रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली. जिह्यात कोरोनाचा वाढत चालले कहर पहाता करावाच्या उपाययोजनाच्या अनुषंगाने वारंवार उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचकरिता जिह्यातील सर्व गावामध्ये ग्रामस्तरीय कृती समिती गठीत करण्यात आली आहे. ही कमिठी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार कामकाज करत आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच आहे. जिह्यातील ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मदये निवडणूका झाल्या असून सरपंच निवडीदेखील पूर्ण झाल्या आहेत. अनेक सरपंच पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम पहात आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय कृती समितीची महत्वाची जबाबदारी आहे. त्याकरिता त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या सुचनांनुसार समितीला मार्गदर्शन करण्यासाठी समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक यांची कार्यशाळा दि. 19 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन झुम मिटींगद्वारे व्हीसीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सुविधेला रेंज नसेल त्यांनी नजिकच्या ग्रामपंचायतीमध्ये जावून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले आहे.