पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमांची संख्या वाढल्याप्रमाणे देशात पेट्रोल, सिलिंडर आदी वस्तूंचे दरही वाढत असल्याची टीका महाराष्ट्राचे काँग्रेस प्रमुख व आमदार सतेज पाटील यांनी केली.
ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी गावात आयोजित काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करीत होते. मन की बातची जेव्हा पहिली मालिका प्रसारित झाली तेव्हा पेट्रोलची किंमत प्रति लिटर ५१ रुपये, सिलिंडरची किंमत ४०० रुपये होते, आणि १०० व्या मालिका पूर्ण झाली त्यावेळी पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपये तर सिलिंडरची किंमत १२०० रुपये झालेली आहे. आणखी किती मन की बात होणार देवच जाने असे त्यांनी उदगार काढले.
उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या गेल्यावेळी निवडणुकीच्या दरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करूनच मी आपल्या पुढे उभी आहे. ग्रामीण मतदारसंघात औधोगिक, उच्च शिक्षण सुरु करण्याचे ध्येय आहे मात्र मी विरोधी पक्षात असल्याने ते काम अजून पूर्ण होणे बाकी आहे. त्या मागण्यादेखील पूर्ण करण्यात येईल. जेव्हा आमची सत्ता नव्हती तेव्हा आमदार होऊन खूपकाही समस्यांना सामोरे जावे लागले पण यंदा काँग्रेसचीच सत्ता येणार असून ग्रामीण मतदारसंघात विकासपर्व सुरु करण्याचा विश्वास व्यक्त केला .
याप्रसंगी माजी मंत्री विश्वजीत कदम, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, युवराज कदम, शंकरगौडा पाटील, बसवराज मॅगोटी, अडीवेश इटगी, सातेरी बेळवटकर व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.