सावंतवाडी / प्रतिनिधी
डेगवे मोयझरवाडी येथील बाबाजी आबाजी देसाई( वय 75 )यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले देसाई हे गोव्यात प्राथमिक शिक्षक होते ते निवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे संचालक, डेगवे सोसायटीचे चेअरमन तसेच भाजपाचे पदाधिकारी प्रवीण देसाई यांचे ते वडील होत. डेगवे येथील स्मशानभूमीत गुरुवारी (आज) सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.