Hasan Mushrif News : कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आज कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकित करण्यात आला होता. त्यानुसार आज ताराराणी चौकात हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेने लावले. या होर्डिंग वरून काँग्रेस संचालकांचे फोटो गायब झाल्याने याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
हसन मुश्रीफ यांच्या शपथविधीनंतर कोल्हापुरात राजकारणाची वेगळी नांदी पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा बॅंक म्हटल्यानंतर होर्डिंग लागणे अपेक्षित आहे. मात्र तसं झालं नाही. समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ होर्डिंग्ज वॉर रंगला आहे. या दोन्ही पोस्टवरून सध्या चर्चा सुरु आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने लावलेल्या होर्डिंगमध्ये आमदार सतेज पाटील,पी.एन.पाटील यांच्यासह शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा फोटो ही टाळला आहे. एवढेच नाही तर याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांचेदेखील होर्डिंग लागले आहेत. निष्ठा जनतेवर, पक्षावर तेच राजेसाहेब आमचे आमदार अस ठळक अक्षरात लिहून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.