तामिळनाडूतील दुर्घटनेनंतर परिसरात चेंगराचेंगरी
@ चेन्नई / वृत्तसंस्था
तामिळनाडूमधील अरक्कोणम येथील मंडियाम्मन मंदिरातील उत्सवादरम्यान पेन कोसळण्याची दुर्घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी पेन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्सवामध्ये क्रेनचा वापर करण्यास परवानगी नसतानाही ती वापरण्यात आल्याने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरक्कोणम येथील मंडियाम्मन मंदिरात मायलेरू उत्सवादरम्यान देवाच्या मूर्तीला हार घालण्यासाठी क्रेन मागविण्यात आली होती. देवाला हार घालत असताना गर्दीमध्ये क्रेनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती एका बाजूला कोसळली. यादरम्यान भल्यामोठय़ा क्रेनखाली सापडून चार भाविकांना प्राण गमवावे लागले. तसेच अन्य काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
या अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून त्यात अनेक लोक पेनला लटकलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात पुष्पहार असून ते लोक मूर्तींना हार घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात धावपळ झाल्याने चेंगराचेंगरी होऊन काहीजण जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.