प्रतिनिधी /पणजी
नादोडा येथील माऊली भूतनाथ पंचातन देवस्थानतर्फे आजगावकर दशावतारी नाटय़मंडळातील कलाकार नरेंद्र गोपाळ गावडे यांचा नादोडा येथील भूतनाथ जत्रोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कलाकार नरेंद्र गावडे यांनी गेली 25 वर्षे सलग भूतनाथ देवस्थानच्या जत्रोत्सवात दशावतारी नाटय़मंडळातून स्त्री भूमिका केली आहे. त्यांच्या कलेची दखल घेऊन शाल, श्रीफळ, रोख रुपये व पुष्पगुच्छ देऊन नरेंद्र गावडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गुरुदास बाळा गवस, प्रणेश गवस, रामा गवस, निवृत्ती गवस, दयानंद गवस, अमृत गवस, शैलेश गवस, तसेच आजगावकर दशावतारी नाटय़मंडळाचे प्रमुख रमेश आजगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम गवस यांनी केले. त्यानंतर आजगावकर दशावतारी नाटय़मंडळातर्फे त्रिवेणी संगम नाटय़प्रयोग सादर करण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.