बिबटय़ा सुसाट : वनखात्याला अपयश : शहरवासीय भीतीच्या छायेखाली
प्रतिनिधी / बेळगाव
रेसकोर्स परिसरात आसरा घेतलेल्या बिबटय़ाचा सहा दिवसानंतरही शोध लागला नाही. शोधण्यासाठी वनखात्याने आता ड्रोन कॅमेरा हाती घेतला आहे. गुरुवारी सांयकाळी ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली. त्यामुळे आता ड्रोन कॅमेऱयात बिबटय़ा कैद होणार का? याची प्रतीक्षा सर्वांनी लागली आहे. त्यामुळे बिबटय़ा अद्याप त्याठिकाणीच आहे की दुसरीकडे गेलाय हे चित्र देखील स्पष्ट होणार आहे.
सहा दिवसांचा कालावधी उलटला तरी वनखात्याच्या सापळय़ात बिबटय़ा सापडला नाही. त्यामुळे बिबटय़ा कधी सापडणार? या चिंतेत शहरवासीय आहेत. जाधवनगर परिसरात एका गंवडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला आहे. त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने बिबटय़ाला पकडण्यासाठी रेसकोर्स परिसरात 14 कॅमेरे, 6 पिंजरे आणि 50 कर्मचारी तैनात केले आहेत.
सोमवारी रात्री एका कॅमेऱयात बिबटय़ाची छबी कैद झाली होती. त्यामुळे शहरवासियांच्या आणि वनखात्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. लवकरच बिबटय़ा जेरबंद होईल, अशी आशा होती. दरम्यान बिबटय़ाची छबी कॅमेऱयात कैद झाली असली तरी अद्याप तो हाताला लागला नाही. त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून परिसरातील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
वनखात्याने दांडेली, बागलकोट आणि गोल्याळी येथून पिंजरे आणून लावले आहेत. शिवाय विशेष पथक देखील बोलाविण्यात आले आहे. वनखाते बिबटय़ाच्या मागावर असून पाऊल खूणा आणि विष्टेचा शोध घेत आहेत. मात्र वनखात्याला बिबटय़ाच्या छबी व्यतिरिक्त इतर काहीच हाताला लागले नाही. त्यामुळे बिबटय़ा जेरबंद कधी होणार? हीच चिंता लागली आहे.
जाधवनगर, सदाशिवनगर, हनुमाननगर, विश्वेश्वरय्यानगर, बॉक्साईट रोड आदी परिसरात धास्ती निर्माण झाली आहे. शाळांना सुट्टी दिली असली तरी लहान मुलांना बाहेर सोडू नये, शिवाय रात्रीचे बाहेर पडू नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे. बिबटय़ाच्या धास्तीने सध्या वावर असलेल्या परिसरात सायंकाळी शांतता पसरत आहे. परिसरातील दुकाने, घरांचे दरवाजे आणि खिडक्मया बंद होत आहेत. मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडणे देखील धोक्मयाचे बनले आहे. त्यामुळे बिबटय़ा कधी सापडतोय? या चिंतेत स्थानिक रहिवासी असल्याचे दिसत आहे.
सोमवारी रात्री ट्रप कॅमेऱयात कैद झालेल्या बिबटय़ाचे चित्र पाहिल्यानंतर हा बिबटय़ा पूर्ण वाढ झालेला आहे. त्यामुळे तो पाळीव प्राण्यांबरोबर माणसांवरही सहज हल्ला करू शकतो. सध्या रेसकोर्स परिसरात आसरा घेतलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखाते अथक प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला म्हणावे तसे यश आले नाही. विशेषतः रेसकोर्स परिसरात दाट झाडी आहेत. शिवाय उपजिविकेसाठी ससे, रानमांजर, मोर आणि भटकी कुत्री असल्याने बिबटय़ा या ठिकाणीच दबला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
बिबटय़ा शहरात किंवा मानवी वसतीत आल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. यापूर्वी हिंडाल्को, कुदेमनी आणि इतर ठिकाणी देखील बिबटय़ाचे दर्शन झाले होते. त्यामुळे अलीकडे बेळगावात देखील बिबटय़ा आल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शहरात येणाऱया वन्यप्राण्यांना रोखण्याचे नवे आवाहन देखील वनखात्यासमोर आहे.
शुक्रवारपासून बिबटय़ासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान सोमवारपासून अधिक कॅमेरे, पिंजरे लावून ही शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वनखात्याचे कर्मचारी रात्रंदिवस बिबटय़ाच्या शोधात आहेत. मात्र अद्याप बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही.
प्रतिक्रिया
एच. एस. ऍथोनी (डीएफओ वनखाते)
बिबटय़ा हा प्राणी सर्रास रात्रीच्यावेळी बाहेर पडतो. त्यामुळे रात्री शोध मोहीम हाती घेतली जात आहे. 50 कर्मचारी बिबटय़ाच्या मागावर आहेत. शिवाय ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध सुरू आहे. बिबटय़ा रेसकोर्स परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे. मात्र लवकरच बिबटय़ा जेरबंद होईल.
22 शाळांना आजही सुटी
बेळगाव शहर व ग्रामीण विभागातील 22 शाळांना शुक्रवारीही सुटी देण्यात आली आहे. बेळगाव शहरातील सरकारी प्राथमिक शाळा हनुमाननगर, सरकारी प्राथमिक शाळा कुवेंपूनगर, सरकारी प्राथमिक शाळा सहय़ाद्रीनगर, सरकारी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, मराठी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्यानगर, केएलई इंटरनॅशनल स्कूल कुवेंपूनगर, वनिता इंग्लिश मीडियम स्कूल, केंद्रीय विद्यालय-2, मराठी विद्यानिकेतन, एनपीईटी स्कूल क्लब रोड, सेंट झेवियर्स स्कूल, जीएलपीएस उर्दू स्कूल टी.व्ही. सेंटर या 13 शाळांसह हिंडलगा व विजयनगर येथील 9 शाळांना सुटी देण्यात आली आहे.