बिजनौर / वृत्तसंस्था
बिजनौरच्या अफजलगडमध्ये जंगलभागातील शेतात सोमवारी एका पवनहंस हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि उत्तराखंडचे एक वरि÷ अधिकारी होते. पायलटने सुरक्षितपणे लँडिंग केल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेले हेलिकॉप्टर डेहराडूनहून हल्द्वानीला जात होते. सोमवारी दुपारी 11.35 च्या सुमारास पवन हंस कंपनीचे हेलिकॉप्टर अचानक जंगलात उतरवण्यात आले. याप्रसंगी कॅप्टन राजकुमार यादव हे हेलिकॉप्टरचे सारथ्य करत होते. तसेच कॅप्टन रत्नेश सिंग हे सहवैमानिक होते. त्यांच्यासमवेत ब्युरो ऑफ सिव्हिल डिफेन्स, डेहराडूनचे संचालक अरुण कुमार सिंग हे हेलिकॉप्टरमध्ये होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तसेच हेलिकॉप्टर अचानक शेतात उतरल्यानंतर स्थानिक लोकांची मोठी गर्दी झाली होती. शहर प्रभारी अनोखी लाल गंगवार, एसआय ब्रिजपाल सिंह फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले होते.