शिमगोत्सवाला फोंड्यापासून होणार प्रारंभ : राज्यभरात 18 ठिकाणी होणार मिरवणुका – पर्वरीलाही मिळाला मिरवणुकीचा मान
पणजी : दरवर्षी लक्ष्यवेधी स्वऊपात होणाऱ्या शिमगोत्सवातील ओस्सय ऽऽ ओस्सयचा निनाद यंदा राज्यात 8 मार्चपासून घुमणार आहे. गोव्याची सांस्कृतिक कला सर्वदूर पोहचवण्यासाठी शिमगोत्सवातील रोमटामेळ, चित्ररथ मिरवणूक, ढोल-ताशे पथके सज्ज होत आहेत. यंदाच्या शिमगोत्सवाला पारंपरिक पद्धतीने फोंड्यापासून सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पर्यटन भवनाच्या सभागृहात काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला उपसभापती ज्योशुआ डिसोझा, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शएट्यो, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा आदी उपस्थित होते.
यंदाही शिमगोत्सव धुमधडाक्यात
पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, शिमगोत्सव साजरा करण्यासाठी तालुका पातळीवरील शिमगोत्सव समितीच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिमगोत्सव साजरा करण्याच्या तारखा ठरविण्यात आल्या. शिमगोत्सवातील वाहतूक व्यवस्था व इतर सोयी-सुविधांसाठी संबंधित समित्यांना सूचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाचा शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा प्रथमच पर्वरीत शिमगोत्सव
शिमगोत्सवातील मिरवणुकांचे आयोजन उत्तर गोवा व दक्षिण गोवा या पद्धतीने क्रमवार करण्यात आल्याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले. यंदा प्रथमच पर्वरी मतदारसंघातही शिमगोत्सव साजरा होणार आहे.
शिमगोत्सवातील मिरवणुकांचे दिवस
- उत्तर गोवा
- फोंडा 8 मार्च
- कळंगुट 9 मार्च
- साखळी 10 मार्च
- डिचोली 10 मार्च
- पणजी 11 मार्च
- पर्वरी 12 मार्च
- म्हापसा 13 मार्च
- वाळपई 14 मार्च
- पेडणे 14 मार्च
- दक्षिण गोवा
- सांगे 15 मार्च
- केपे 16 मार्च
- कुडचडे 16 मार्च
- वास्को 17 मार्च
- मडगाव 18 मार्च
- शिरोडा 19 मार्च
- धारबांदोडा 19 मार्च
- कुंकळ्ळी 20 मार्च
- काणकोण 21 मार्च
पणजीत ख•sच ख•s, तरीही…
राजधानी पणजीत 11 मार्च रोजी शिमगोत्सव साजरा होणार आहे. हिंदू बांधव व कलाकारांसाठी शिमगोत्सव उत्सव हा प्रिय असल्याने या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. परंतु सध्यात पणजीतील सर्वच रस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळे खणण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. कार्निव्हल दरम्यान अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचीही दमछाक झाली होती. शिमगोत्सवावेळी तोच अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना काढणे गरजेचे बनले आहे.