अमेरिकेच्या प्रथम महिला अर्थात राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या पत्नी जिल या लवकरच युक्रेनच्या सीमाप्रदेशाचा दौरा करणार असून युक्रेनमधून अन्यत्र स्थलांतरित झालेल्या नागरिकांना भेटण्याची त्यांची योजना आहे. रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेनवासियांचे होणारे हाल आपल्याच्याने पाहावत नाहीत. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची दुःखे जाणून घेतल्याखेरीज आपल्या मनाला समाधान वाटणार नाही, अशी भावना त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लवकरच त्या रोमानिया आणि स्लोव्हाकिया या देशांना भेट देणार आहेत. या देशांची सीमा युपेनला लागून आहे. त्या सीमावर्ती भागांमध्ये जाऊन स्थलांतरितांची विचारपूस करणार आहेत. या भेटीत त्यांचे पती जोसेफ बायडेन हे त्यांच्यासमवेत असणार नाहीत. जागतिक मातादिनी त्यांच्या भेटीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांनी अमेरिका सोडली असून भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी त्या रोमानियामध्ये पोहोचतील, असे सांगण्यात आले.
रोमानिया आणि स्लोव्हाकिया या दोन देशांमध्ये दशलक्षावधी युपेनियन लोकांनी आश्रय घेतला आहे. त्यामध्ये बव्हंशी महिला आणि मुलांचा समावेश आहे. दुसऱया महायुद्धानंतरचा हा युरोपमधील सर्वात मोठा स्थलांतरितांचा प्रश्न आहे.
चार दिवसांचा युरोप दौरा
शनिवारपासून चार दिवस जिल बायडेन युरोपच्या दौऱयावर असतील. प्रथम त्या रोमानियामधील कोगालनिसू तळाला भेट देतील. हा तळ काळय़ा समुद्राच्यानजीक आहे. याच काळय़ा समुद्रावरील वर्चस्वासाठी रशिया आणि युपेन यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. युपेनचे मारियोपोल बंदर रशियाने ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने रशियात नियुक्त केलेल्या हजारो सैनिकांचे वास्तव्यही या तळावर आहे. जिल बायडेन या सैनिकांच्या अधिकाऱयांची भेट घेणार आहेत.
जागतिक मातादिनी कार्यक्रम
रविवारी जागतिक माता दिन आहे. जिल या स्वतः तीन मुलांच्या माता असून स्लोव्हाकिया सीमारेषेवर त्या युपेनियन स्थलांतरित मातांची भेट घेणार आहेत. अमेरिकेत जिल यांनी युपेन युद्धासंबंधी अनेक कार्यक्रमांना संबोधित केले असून युक्रेनियन स्थलांतरितांसाठी मानवी साहाय्यता मिळवून देण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. बायडेन यांच्या कन्या अश्ले आपल्या मातेबरोबर या दौऱयावर येणार होत्या. तथापि, त्या दोन दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. युपेनमधील स्थलांतरित मातांना किती संकटांचा सामना करावा लागत असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो, असे भावपूर्ण उद्गार जिल यांनी दौरा सुरू होण्यापूर्वी काढल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्याला युपेनियन लोकांची भाषा येत नसली तरी भावनांचे आदानप्रदान आपण करू, अशीही भावना त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
रशियाला संदेश
जिल बायडेन यांनी युपेनमधील स्थलांतरितांना भेट देणे हा रशियासाठी मोठा आणि स्पष्ट संदेश आहे, असे मत अमेरिकेतील तज्ञांनी व्यक्त केले आहे. रशियाने आता झाले तेवढे पुरे झाले असे समजून युद्ध त्वरित थांबवावे. हे युद्ध जिंकण्याची आशा त्यांनी सोडून द्यावी. अमेरिका ठामपणे युपेनच्या पाठीशी उभी असून हे युद्ध जिंकणे रशियासाठी शक्मय नाही, हे त्या देशाने समजून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच जिल यांचा हा दौरा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेकडून गांभीर्याने दखल
@जिल बायडेन यांचा दौरा अमेरिकेने युद्ध गांभीर्याने घेतल्याचा पुरावा
@युपेनच्या स्थलांतरित महिलांसाठी मानवीय साहाय्यता दिली जाणार
@रोमानियामध्ये 25 लाख युपेनियन महिला स्थलांतरितांचे वास्तव्य
@स्लोव्हाकियामध्ये स्थलांतरितांच्या अतिसंख्येमुळे सुविधांची वानवा