कोगनोळी तपासनाका सतर्क : आचारसंहितेचे काटेकोर पालन
कोगनोळी : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील टोलनाक्यानजीक तपासणी नाका उभारला आहे. येथे दररोज सुमारे अडीच हजार वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. बेकायदा वस्तू व रोकड याकडे बारीक लक्ष ठेवले जात असून जप्तीची कारवाई केली जात आहे. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्र व अन्य राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची याठिकाणी कसून चौकशी व तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये या नाक्मयावर रोख रक्कम, कपडे व अन्य साहित्य जप्त केले आहे. याठिकाणी पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावतीने तीन शिफ्टमध्ये तपासणीचे काम सुरू आहे.