खासदार संजय मंडलिक यांची माहिती
कोल्हापूरः प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मार्च २०२२ च्या अर्थ संकल्पामध्ये १५ रुपये कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्टेट हायवे, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचा समावेश असल्याची माहीती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
जिल्ह्यातील चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, जेऊर, श्रृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्ता राज्य मार्ग २०१ कि. मी. सुधारणेसह आर.सी.सी. गटर्स बांधकाम करण्यासाठी ५० लाख, चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, जेऊर, श्रृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्ता रा. मा. २०१ कि. मी. तालुका आजरा सुधारणा करण्याकरता १ कोटी, चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, जेऊर श्रृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्ता रा.मा. २०१ कि. मी. ता. गडहिंग्लज सुधारणा करण्यासाठी ४ कोटी, कोल्हापूर (शेंडापार्क जवळून) कंदलगांव, कोगीलखुर्द इतर जिल्हा मार्ग ७४ कि. मी. च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी २ कोटी ८५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ४१ पासून चक्रेश्वरवाडी – बारडवाडी – भैरेवाडी – ठिकपुर्ली – निगवे खालसा इजिमा ५९ कि. मी. मध्ये डांबरीकरण करण्यासाठी ९५ लाख, सांगरुळ, म्हारुळ, बहिरेश्वर, कोगे, कोगेपाटी, एम. एस. ई. बी ते बरसोबा देवालय ते रा. मा. १९४ ला मिळणारा इजिमा क्र. ७० कि. मी. मधील रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ९५ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग मार्ग क्र. ४ ते चित्रनगरी ते इतर जिल्हा मार्ग क्र. ७४ ला मिळणारा ग्रामीण मार्ग ४९ कि. मी. रुंदीकरणासह सुधारणा करणेकरता १ कोटी ९० लाख, इतर जिल्हा मार्ग क्र. १८६ पासून निगवे खालसा ते परिते मार्गे ग्रामीण मार्ग क्र. ८० कि. मी.मध्ये डांबरीकरण करण्यासाठी ९५ लाख, ग्रामीण मार्ग क्र. १२२ ते धनगरवाडा वसाहतीजवळून प्रमुख जिल्हा मार्ग २९ ला मिळणारा रस्ता ग्राणीण मार्ग क्र. १२७ कि. मी. च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ९५ लाख, राज्य मार्ग क्र. १९४ पासून भुये, राजाराम वेअर रस्ता ग्रामीण मार्ग क्र. 12 कि.मी. च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ९५ लाख मंजूर झाले असून सदर कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता व वर्क ऑर्डरची प्रक्रिया पुर्ण होवून पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होईल. तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या सुधारणांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुन जास्तीत जास्त निधी आणणेसाठी प्रयत्न केला जाईल असेही खासदार मंडलिक यांनी सांगितले.