डिचोली/प्रतिनिधी
सोमवारी रात्री जोरदार वाऱयासह पडलेल्या पावसामुळे डिचोली तालुक्मयातील काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. साखळी व डिचोली येथे घरांवर झाडे पडल्याने सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर पडलेली झाडेही डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी मदतकार्य करताना हटविली.
तुळशीमळा साखळी येथे रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्याने या भागातून होणाऱया वाहतुकीवर परिणाम झाला. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर झाड हटवून वाहतूक मोकळी करून दिली. साखळी येथे एका घरावर गुलमोहराचे झाड पडल्याने 20 हजार रूपयांचे नुकसान झाले. तर नागझरवाडा डिचोली येथील एका घरावर रानटी झाड पडल्याने त्यांचे सुमारे 5 हजारांचे नुकसान झाले. या सर्व ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेत मालमत्ता वाचवली.
मये येथे एका विहीरीत पडलेल्या वासरालाही डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी सोमवारी (दि. 25) जिवनदान दिले. या सर्व बचावकार्यात दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ केसरकर, व्हि. डी. गावकर, एस. एल. मळीक, आर. आर. मातोणकर, आर. एम. एकावडे, आशिश मोर्लेकर, सुरज कुंकळकर, एस. यु. उसपकर, एच. एच. सावंत, व्हि. एम. गाड या जवानांनी सहभाग घेतला.
कारापूर येथे झोपडीला आग
कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील कारापूर येथे तनुजा नाईक यांच्या झोपडीला सोम. दि. 25 एप्रिल रोजी आग लागल्याने त्यांचे सुमारे 25 हजारांचे नुकसान झाले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्मयात आणली. तोपर्यंत झोपडीचा जास्तीत जास्त भाग जळून खाक झाला होता.