वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनी टेक कंपनी ओप्पो यांनी भारतीय बाजारात ओप्पो फाइंड एन3 फ्लिप हा स्मार्टफोन सादर केला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यासह जगातील पहिला फ्लिप स्मार्टफोन राहणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे.
यामध्ये 12 जीबी व 265 जीबी या एकाच प्रकारात सादर केले आहेत. याची किंमत 94,999 रुपये आहे. बुकिंग सुरु झाले असून खरेदीसाठी 22 ऑक्टोबरपासून ओप्पोच्या अधिकृत वेबसाईटवर व ई कॉमर्स वेबसाईटवर फ्लिपकार्टवर संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 5 सोबत स्पर्धा राहणार आहे.