प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज 14 जून रोजी सायंकाळी गोव्यात येत आहेत. उद्या 15 रोजी सकाळी 10 वा. दोनापावला येथील राजभवन प्रकल्पाच्या विस्तारित इमारतीचा शिलान्यास राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल श्रीधरन पिल्लई हे राष्ट्रपतींचे विमानतळावर स्वागत करतील. 15 रोजी दुपारनंतर ते नवी दिल्लीकडे प्रयाण करतील. आज राष्ट्रपती राजभवनवर मुक्काम करतील.