ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावला. त्याचबरोबर चौकशी सुरू केली आहे. त्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला
असून बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, राजू सेठ, ॲडव्होकेट आर. पी. पाटील, किरण पाटील, ॲडव्होकेट सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.