काळ्या हिऱ्यांनी सजतात नखं
जगातील प्रत्येक महिला सुंदर दिसू इच्छिते, स्वत:च्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंट घेत असतात. केवळ चेहऱ्यावर नव्हे तर हात अन् पायांची सुंदरता देखील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. याकरता मेनिक्योरपासून पेडिक्योर देखील महिला करवित असतात. महिलांसाठी त्यांच्या नखांची सजावट देखील अत्यंत महत्त्वची असते. तुम्ही अनेक प्रकारच्या रंगांचे आणि अनेक पॅटर्नचे नेल आर्ट पाहिले असतील. परंतु एका नेलपेंटची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. जगातील सर्वात महागडा नेलपेंट अजेचरचा आहे. या नेलपेंटला लॉस एंजिलिसचे डिझाइनयर अजेचर पोगोसियान यांनी तयार पेला आहे. या नेलपेंटच्या एका छोट्याशा बाटलीच्या किमतीत तुम्ही तीन मर्सिडीज कार खरेदी करू शकता. या नेलपेंटमध्ये काळ्या हिऱ्यांचा वापर केला जातो. या हिऱ्यांना तोडून त्यांना नेलपेंटमध्ये मिसळले जाते. म्हणजेच तुम्ही हा नेलपेंट लावल्यावर तुमच्या नखांना तुम्ही काळ्या हिऱ्यांना सजवत असता. या नेलपेंटची किंमत सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे. एवढ्या रकमेत सहजपणे मर्सिडीजच्या तीन कार खरेदी करता येणार आहेत.