4 हजार 700 रुपये प्राथमिक तिकीट दर
बेळगाव : मागील अनेक दिवसांपासून बेळगावमधील नागरिकांची मागणी असणारी बेळगाव-दिल्ली विमानफेरी अखेर दि. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीने शुक्रवारी सायंकाळपासून तिकीट बुकिंगला सुऊवात केली असून सध्या 4 हजार 700 रुपये प्राथमिक दर लागू केले आहेत. त्यामुळे बेळगावमधील नागरिकांना ‘दिल्ली अभी दूर नही’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बेळगाव-दिल्ली विमानफेरी 2 वर्षांपूर्वी स्पाईस जेट कंपनीने सुरू केली होती. काही दिवसांपूरती मर्यादित असणारी विमानसेवा नंतर आठवडाभर करण्यात आली. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बोईंग विमान बेळगावच्या सांबरा विमानतळावर उतरू लागले. परंतु अचानक स्पाईस जेटने तांत्रिक कारण देत ही विमानफेरी बंद केली.
यामुळे नागरिकांमधून टीकेची झोड उठविण्यात आली. राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी यांनी विमान वाहतूक उ•ाणमंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची वारंवार भेट घेऊन दिल्ली शहराला विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. विमानफेरी सुरू करण्याचा अधिकार पूर्णपणे विमान कंपन्यांना असल्याचे लक्षात येताच त्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विमानफेरी सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. इंडिगोने विमानफेरी सुरू करण्यास सहमती दर्शविली. परंतु जोवर तिकीट बुकिंगला सुऊवात होत नाही तोवर शाश्वती नव्हती. शुक्रवार दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरीचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. 189 आसन क्षमता असणारी एअरबस प्रवाशांची वाहतूक करणार आहे. इंडिगोच्या वेबसाईटवर ग्राहकांना तिकीट बुकिंग करता येणार आहे. दुपारी 3.45 वाजता दिल्ली येथून उ•ाण घेतलेले विमान सायंकाळी 6.05 वाजता बेळगावला पोहोचेल. तर सायंकाळी 6.35 वाजता बेळगावमधून उ•ाण घेतलेले विमान रात्री 9 वाजता दिल्ली येथे पोहोचणार आहे.
प्रवाशांमध्ये समाधान
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराला बेळगावमधून शेकडो नागरिकांची ये-जा असते. विशेषत: लष्करी अधिकारी, जवान, उद्योजक, व्यापारी यांची दररोज ये-जा असते. बेळगावमधून विमानफेरी बंद झाल्याने या प्रवाशांना एक तर हुबळी अथवा गोवा येथील मोपा विमानतळावरून ये-जा करावी लागत होती. आता थेट विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.