ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बोरघाटात आणि खालापूर टोलजवळ एक ते दीड किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळी सुट्टीसाठी चाकरमानी मुंबईबाहेर पडत असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावाला जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. गेल्या एक तासापासून बोरघाटात अमृतांजन ब्रीज ते दत्तमंदिरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. बोरघाट टॅबचे महामार्ग वाहतूक पोलीस कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर खालापूर टोलनाक्याजवळ जवळपास एक ते दीड किलोमीटर वाहनांची रांग आहे. सलग दुसऱ्या दिवशी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. काल देखील या मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती.
अधिक वाचा : मान्सून दोन दिवसात भारताबाहेर