कोरोना विषाणूची लागण जगभरात 1 कोटी 21 लाख 96 हजार 923 जणांना झाली आहे. यातील 70 लाख 93 हजार 765 बाधितांनी महामारीवर मात केली आहे. तर 5 लाख 52 हजार 771 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. याचदरम्यान चीनने पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) बचाव केला आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिझियान यांनी डब्ल्यूएचओ वैद्यकीय क्षेत्रातील एक मध्यवर्ती संस्था असून त्यातून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा निर्णय एकतर्फी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने अंग काढून घेतल्याने विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय मदत प्राप्त करणे अवघड ठरणार असल्याचे झाओ म्हणाले. अमेरिकेच्या मिसीसिपी प्रांतात 26 आमदार कोरोनाबाधित आढळले आहेत. मिसीसिपी प्रांताच्या 174 सदस्यीय विधानसभेचे अधिवेशन 1 जुलै रोजी संपुष्टात आले आहे. अधिवेशनादरम्यान अनेक आमदार मास्कशिवाय तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे आढळून आले होते. अमेरिकेत 60 हजार नवे बाधित सापडले आहेत. कुठल्याही देशात एका दिवसात आढळून आलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. वाढत्या संसर्गानंतरही व्हाइट हाउस देशातील शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी शाळा सुरू न केल्यास वित्तपुरवठय़ात कपात करणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी शाळांशी संबंधित सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या दिशानिर्देशांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
Trending
- कणबर्गीत रंगले मृदंग संमेलन
- विकासासाठी मतभेद बाजूला सारुन अंजली निंबाळकर यांना विजय करा
- बेनकनहळ्ळी लक्ष्मीदेवीचा शांती पूजन मंगलमय वातावरणात
- मंगळसूत्राबद्दल बोलणाऱ्या मोदींना त्याचे महत्त्व काय माहीत?
- काँग्रेस उमेदवार प्रियांका यांना डॉ.द्वारकानाथांकडून शुभेच्छा
- येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ
- भाजपकडून पुन्हा भावनिक मुद्द्यावरच निवडणूक
- अळणावर येथील श्री लक्ष्मीदेवी, श्री दुर्गादेवी यात्रेची सांगता