नवी दिल्ली
हवाई उद्योगातील मोठी कंपनी एअर इंडियाच्या चेअरमनपदी विक्रम देवदत्त यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नुकतीच माहिती दिली आहे. टाटाने एअर इंडियासाठी 18000 कोटी मोजून बोली लावली होती व हा प्रस्ताव केंद्राने स्वीकारलेला असला तरी त्यासंबंधातील कार्यवाही पूर्ण झालेली नाही. चेअरमनपदासोबत विक्रम देवदत्त हे व्यवस्थापकीय संचालक हे पद सांभाळणार आहेत.