प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी केवळ पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर दिवसभरात तब्बल 52 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण लक्षणीयरीत्या कायम राहिल्याने दिलासा मिळाला आहेत. दरम्यान जिल्ह्यातील आजपर्यंत आज अखेर 692 रुग्णांपैकी 528 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 156 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी दिली.
मंगळवारी दिवसभरात 1 हजार 146 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 125 जणांचे स्वॅब घेतले आहेत. पॉझिटिव्हमध्ये चंदगडमधील दोन, गडहिंग्लज, कागल आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.