गृहराज्यमंत्री ना. शभराजे देसाई यांच्याकडून दोन लाखाची मदत
वारणानगर / प्रतिनिधी
सातारा येथील महाराष्ट्र केसरीची कुस्ती जिकंल्यावर आज रविवारी पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी प्रथमच श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे जोतिबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकानी देखील त्याला भेटून अभिनंदन केले.
पन्हाळा तालुक्कातील देवठाणे येथील पैलवान पृथ्वीराज पाटील याने शनिवारी सातारा येथे झालेली महाराष्ट्र केसरीची कुस्ती जिकंत तब्बल २२ वर्षानी शाहूच्या कुस्ती पंढरीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला.
गृहराज्यमंत्री ना. देसाई कडून दोन लाख रुपयाची मदत
पाटण येथील श्री. शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टचा वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई यानी दोन लाख रु. मदतीचा चेक पै. पृथ्वीराज पाटील याच्या महाराष्ट्र केसरीतील यशाबद्दल दिला. ना. शंभूराजे देसाई यांचे स्वीय सहाध्यक राजू घाटगे यानी आणलेला धनादेश शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक रविद्र सांळोखे यांच्या हस्ते पै. पृथ्वीराज यांच्याकडे सपूर्द करण्यात आला. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील उपस्थित होते.