दूरसंचार, रिटेलसह सर्व व्यवसाय जोमात- 96 टक्के कर्मचाऱयांचे पूर्ण लसीकरण
वृत्तसंस्था/ मुंबई
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने सप्टेंबर तिमाहीत दमदार वृद्धीची नोंद केली आहे. रिलायन्सचा निव्वळ नफा 43 टक्क्मयाने वाढत 13 हजार 680 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यांच्या रिटेल, दूरसंचारसह इतर कंपन्यांनीही चांगली प्रगती गत तिमाहीत साध्य केली आहे.
मागच्या वषी समान अवधीत कंपनीला 9 हजार 567 कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीत कंपनीचा महसूल 49 टक्के वाढून 1.74 लाख कोटी रुपयांवर पोहचला. जियो प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 3 हजार 278 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत समान अवधीत 23 टक्के वाढ नोंदली गेली आहे. 30 सप्टेंबर अखेर जियोची ग्राहक संख्या 42 कोटी 95 लाख इतकी राहिली होती. जियोने गेल्या सात तिमाहीत सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान रिलायन्स रिटेलची तिमाहीतील सरासरी विक्री 45 हजार 426 कोटी रुपयांची राहिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 45 टक्के जास्त आहे. रिलायन्सने कोरोना काळात सुरक्षिततेसाठी म्हणून कर्मचाऱयांच्या लसीकरणावर भर दिला आहे. 96 टक्के कर्मचाऱयांनी दोन्ही लसीचे डोस घेतले आहेत. तर दुसरीकडे कंपनीचा नवा न्यू एनर्जीचा व्यवसायही चांगली प्रगती करतो आहे.