आर्टिफिशियल कॉर्नियाचे प्रत्यारोपण
आर्टिफिशियल (कृत्रिम) कॉर्नियाच्या मदतीने 78 वर्षीय जमाल फुरानी यांची दृष्टी परतली आहे. आतापर्यंत ते पूर्णपणे अंध होते. इस्रायलचे रहिवासी असलेल्या जमाल यांच्या डोळय़ात थेट स्वरुपात आर्टिफिशियल कॉर्नियाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर आता ते कुटुंबीयांना डोळे भरून पाहू शकत आहेत.
गमाविली होती दृष्टी
जमाल यांना कॉर्नियल आजाराने ग्रासले होते, यातूनच 10 वर्षांपूर्वी त्यांची दृष्टी गेली होती. जमाल यांच्यावर 11 जानेवारी रोजी इस्रायलमध्ये रेबिन मेडिकल सेंटरमध्ये प्राध्यापक इरित बहार यांनी शस्त्रक्रिया केली आहे. ही एक मोठी कामगिरी आहे, कारण जगभरात दरवर्षी कॉर्नियल आजाराचे 20 लाख रुग्ण दिसून येतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
कॉर्निया म्हणजे काय?
कॉर्निया डोळय़ातील पारदर्शक हिस्सा असून त्यावर बाहेरील प्रकाश पडतो. बुब्बुळ आणि लेन्स कॉर्नियाचाच हिस्सा असतात. कॉर्नियाच्या मदतीने बाहेरील प्रकाश बुब्बुळांमध्ये पोहोचतो. यातूनच आम्ही समोरील गोष्टी पाहू शकतो. कॉर्नियाला हानी झाल्यास थेट प्रभाव डोळय़ांच्या दृष्टीक्षमतेवर पडतो. स्थिती गंभीर झाल्यास व्यक्तीला दिसणे बंद होते.
10 रुग्णांवर होणार प्रत्यारोपण
डोळय़ांमध्ये बसविण्यात आलेला आर्टिफिशियल कॉर्निया हा अतिसुक्ष्म पेशींपासून तयार करण्यात आला आहे. कॉर्नियल आजारांनी ग्रस्त 10 रुग्णांवर याचे प्रत्यारोपण होणर आहे. इस्रायलने मागील वर्षी जुलै महिन्यात यासंबंधीच्या परीक्षणाला अनुमती दिली होती.