17 मिनिटात पूर्ण चार्ज होणार असल्याचा दावा
नवी दिल्ली
शाओमी कंपनीचा 11टी प्रो 5 जी स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. यामध्ये 120 एचझेडचा अमोलेड डिस्प्ले आणि 120 डब्लू फास्ट चार्जिंगची सोय मिळणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सदरचा फोन ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रगन 888 एसओसीवर चालतो.
स्मार्टफोनच्या मॉडेलसोबत किमती
भारतामध्ये शाओमी 11 टी प्रो 5 जी मध्ये सादर करण्यात आल्यानंतर त्याची किमत ही 8 जीबी, 128 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी 39,999 रुपये असेल. तसेच 8जीबी 265 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत 41,999 रुपये असून यामध्ये टॉप ऑफ द लाइन 12 जीबीसह 256 जीबीची किमत ही 43,999 रुपये राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
विशेष सुविधा….
सदरचा स्मार्टफोन हा सेलेस्टियल मॅझिक, ग्रे आणि मूनलाईट व्हाईट कलरचा ग्राहकांसाठी पर्याय मिळणार
सदरचा फोन हा अँड्रॉईड 11 वर चालतो
यामध्ये 6.67 इंच पूर्ण एचडी 10 बिट ट्रू कलर फ्लॅट अमोलेड डिस्प्ले
डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सपोर्टसोबत येणार आहे. यामध्ये 480 एचझेड पर्यंत टच सँपलिंग रेट आहे.
कनेक्टिविटीच्या पर्यायात 5 जी, 4जी एलटीई, वायफाय6 ब्लूटय़ूथ, जीपीएस/एनएव्हीआयसी, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर व एक युएसबी टाईप सी पोर्ट
5,000 एमएएच क्षमतेसोबत डब्बल सेल बॅटरीसोबत 120 डब्लू हायपरचार्ज फास्ट वायर्ड चार्जिंगसोबत येणार