वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचा 27 वर्षीय फुटबॉलपटू अर्जुन पुरस्कार विजेता संदेश झिंगनने एटीके-मोहन बगान फुटबॉल क्लबबरोबर नुकताच नवा करार केला आहे. शनिवारी एटीके-बगान क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी ही घोषणा केली.
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील एटीके-बगान हा विद्यमान विजेता आहे. काही महिन्यापूर्वी एटीके संघाचे मोहन बगानमध्ये विलीनीकरण झाले होते. संदेश यापूर्वी केरळ ब्लास्टर्स संघाकडून इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळत होता. 2015 साली संदेशचा भारतीय फुटबॉल संघामध्ये पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता.