बेंगळूर : सर्व मागासवर्गीय समुदायांच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. दावणगेरे जिल्हय़ाच्या बेळ्ळोडी येथे बांधलेल्या नूतन विद्यार्थी निलय, समुदाय भवन आणि मुख्य महाद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्व समुदायांच्या विकासासाठी सरकारने विविध योजना आखल्या असून आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यापेक्षा अधिक वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. हालुमत समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कुलशास्त्रींच्या अध्ययनाचा अभ्यासासाठी उच्चस्तरिय समितीची रचना करण्यात आली आहे. लकवरच याचा अहवाल मिळणार आहे. याचबरोबर एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा मोठय़ा मतांच्या अंतराने विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Trending
- बेळगावच्या विकासाचे शेट्टर यांचे आश्वासन
- प्रियांका जारकीहोळी यांना एनएसयूआयचा पाठिंबा
- काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज गोकाकमध्ये मेळावा
- संगीत कलाकार संघाच्या वार्षिकोत्सवाची सांगता
- शिडकाव्यानंतर पावसाची पुन्हा हुलकावणी
- घरोघरी जावून मतदार चिठ्ठ्या द्या
- प्रसार माध्यमांवर नजर ठेवा
- वाढत्या उन्हाने दूध उत्पादनात घट