नवीन रुग्ण नाही : एकूण 98 जण कोरोना मुक्त : कंटेनमेन्ट झोनही निम्म्यावर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या महिनाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना गेल्या दोन दिवसांत एकही नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण 154 बाधित रुग्णांपैकी 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कंटेनमेन्ट झोनही 80 वरून 44 पर्यंत कमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी मंगळवारी दिली.
मार्च महिन्याच्या 25 तारीखला जिल्हय़ात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या 29 तारीखला दुसरा रुग्ण आढळला होता. मे महिन्यात मात्र रुग्णवाढीचा वेग झपाटय़ाने वाढला आणि ही संख्या 154 पर्यंत पोहोचली. यातील बहुतांश रुग्ण हे मुंबईतून आले होते. गेल्या आठवडाभरापासून रुग्ण वाढीचा वेग मात्र कमी झाला आहे. आतापर्यंत 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाबाधित 154 रुग्णांपैकी 98 रुग्ण बरे झाले, तर चारजणांचा मृत्यू आणि एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 51 आहे.
कंटेनमेन्ट झोनही झाले कमी
रुग्णवाढीचा वेग कमी झाला आणि रुग्णही बरे होऊ लागल्याने कंटेनमेन्ट झोनही कमी करण्यात आले आहेत. एकूण 80 कंटेनमेन्ट झोनपैकी 36 कमी करण्यात आले आहेत. देवगड तालुक्मयातील सातपैकी सहा, कणकवली तालुक्मयात 24 पैकी 11 झोन, वैभववाडीत सहापैकी तीन, मालवण तालुक्यात सातपैकी पाच, कुडाळ तालुक्यात 15 पैकी सहा, वेंगुर्ले तालुक्यात दोन पैकी एक, सावंतवाडी तालुक्यात 17 पैकी 10, तर दोडामार्ग तालुक्यात दोन कंटेनमेन्ट झोन अजूनही कायम आहेत.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 03028
अहवाल प्राप्त झालेले नमुने 02903
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00154
निगेटिव्ह आलेले नमुने 02749
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00125
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 00051
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 00098
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 00004
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 00079
मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 05589
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 16608
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 00108
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 14638
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 01862
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 97827