ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शिरवळ हे शहर आजपासून (दि.27)अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. लॉकडाऊनदरम्यान, नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा निर्णय प्रांताधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार घेण्यात आला आहे.
शिरवळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच या परिसरातील सर्व दुकाने, व्यवसाय आणि आस्थापना बंद राहणार असून, दूध, भाजीपाला, तसेच अत्यावश्यक सेवा घरपोच सुरू ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, बाधितांच्या संपर्कातील लोकांचे गृह आणि संस्था विलगीकरण करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांकडून तालुका आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.